अभिनेत्री प्रार्थना बेहेरे घरात बसून असा घालवतेय वेळ, आई-वडिलांसोबत असा करतेय वेळेचा सदुपयोग

By  
on  

सध्याच्या क्वारंटाईन काळात कलाकार मंडळीही त्यांच्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. ऐरवी चित्रीकरण आणि विविध कार्यक्रमात व्यस्त असलेले हे कलाकार लॉकडाउनमुळे घरात बसलेले  आहेत. या निमित्ताने त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता येत आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या या लॉकडाउनच्या काळात तिच्या आई-वडिलांसोबत राहतेय. नुकतच पिपींगमून मराठीच्या लाईव्ह मुलाखतीत प्रार्थनाने सध्या ती घरात बसून काय काय करतेय याविषयी सांगीतलं. प्रार्थना सध्या विविधं वेबसिरीज पाहतेय, पुस्तकंही वाचतेय. शिवाय आईकडून तिचे आवडते पदार्थही शिकतेय. प्रार्थनाच्या घरी फिल्मी नावाचं गोंडस पेट आहे. तिच्यासोबतही प्रार्थना छान वेळ घालवतेय. 

नुकताच प्रार्थनाने तिच्या वडिलांसोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये प्रार्थनाचे वडिल तिला तेल मालिश म्हणजेच चंपी करून देस आहेत. वडिलांविषयी सांगताना प्रार्थना सांगते की “मी सध्या वडिलांसोबत सिनेमे पाहतेय. विशेषकरून अमोल पालेकर यांचे सिनेमे मी वडिलांसोबत पाहतेय.”


या लाईव्ह मुलाखतीत चाहत्यांसोबत बोलत असताना प्रार्थनाने तिच्या आगामी प्रोजेक्टविषयीही सांगीतलं. प्रार्थनाची लवकरच हिंदी वेबसिरीज प्रदर्शित होणार आहे. जी तिच्या पतिने म्हणजेच अभिषेक जावकर यांनी दिग्दर्शित केली आहे.  प्रार्थनाच्या कॉफी आणि बरच काही या सिनेमाला नुकतीच 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने प्रार्थना सांगते की, “या सिनेमासाठी स्क्रिप्ट एकाच रात्री वाचून दुसऱ्या दिवशी होकार दिला होता. या सिनेमामुळे दोन मित्र मला मिळाले ते म्हणजे वैभव आणि भूषण. या सिनेमाने खुप काही दिलय.”


या लाईव्ह मुलाखतीत एका चाहत्याने आयुष्यातील सगळ्यात आवडता क्षण विचारला असता प्रार्थना म्हटली की, “आयुष्यातील बेस्ट मोमेंट म्हणजे माझं लग्न. ज्या पद्धतिने सगळं अचानक ठरलं, अरेंज मॅरेज असल्याने पहिल्यांदा आम्ही भेटलो होते. ती प्रोसेस, 15 दिवसांत भेटलो आणि एका महिन्यात एन्गेजमेंट झाली. आणि तीन महिन्यात लग्न झालं.”


 एकूणच प्रार्थना तिचा हा क्वारंटाईन टाईम परिवारासोबत मजेत घालवतेय. मात्र सध्याच्या स्थितीचं गांभिर्यही तिला आहे म्हणूनच घरात बसण्याचही ती सगळ्यांना आवाहन करते.
 

Recommended

Loading...
Share