सध्याच्या लॉकडाउनच्या काळात घरात बसून लोकं सोशल मिडीयाचा जास्तीत जास्त वापर करत आहेत. एकीकडे मनोरंजनासाठी लोकं वेब प्लॅटफॉर्मकडेही मोठ्या संख्येने वळली आहेत. तर सोशल मिडीयावर लाईव्ह जाऊन एकमेकांशी संवाद साधण्याचाही प्रयत्न सुरु आहे.
This Sunday.
पर्वा दुपारी.
12:34pm. @Facebook and @instagram LIVE !!! pic.twitter.com/oYQgtAjUzl
— कुमार महाजन (@swwapniljoshi) April 10, 2020
अभिनेता स्वप्निल जोशीही त्याच्या चाहत्यांशी गप्पा मारण्यासाठी लवकरच त्याच्या सोशल मिडीया साईटवर लाईव्ह येणार आहे. मात्र यासाठी आहे खास निमित्त. कारण या लाईव्हमध्ये स्वप्निल त्याच्या चाहत्यांना सांगणार आहे एक गुड न्यूज. आता ही गुड न्यूज काय आहे यासाठी येत्या रविवारी स्वप्निलचा हा लाईव्ह व्हिडीओ पाहावा लागेल. नुकतच स्वप्निलने त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट करून याविषयीची माहिती दिली. या व्हिडीओत स्वप्निल म्हणतो की, “तुमच्याबरोबर एक गुड न्यूज शेयर करणार आहे. न्यूज खरतर फार मोठी नाही.पण महत्त्वाची नक्की आहे. आणि आजपर्यंत जे काही चांगलं वाईट केलयं ते तुमच्याबरोबर नेहमी शेयर केलय तेव्हा ही न्यूज पण शेयर करणार आहे.”
या लाईव्हची वेळही स्वप्निलने 12.34 अशी ठेवली आहे. या वेळेला एक दोन तीन चार असं म्हणत स्वप्निलने हा व्हिडीओ शेयर केलाय.