By  
on  

'डेट विथ सई'साठी सज्ज व्हा

सेलिब्रिटी म्हटलं की चाहते आलेच. चाहतावर्गाशिवाय सेलिब्रिटींना आपण सेलिब्रिटी म्हणूच शकत नाही. आपल्या आवडत्या नायक किंवा नायिकेवर चाहते जीव ओवाळून टाकतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी जीवाचा आटापीटा करतात. त्यांच्या सारखं दिसण्याचा वागण्याचा, त्यांच्यासारख्या वस्तू वापरण्याचा ते प्रयत्न करतात आणि आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या प्रत्येक कामाला मनापासून दाद देतात. अभिनेत्री सई ताम्हणकरच्या अशाच एका वेड्या चाहत्याची एक नाट्यमय कथा वेबसिरीजमधून अनुभवता येणार आहे.

पण कधी आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसाठी वेडा झालेला चाहता तुम्ही पाहिलाय का, नसेल तर तो थरकाप उडवणा-या चाहत्याच्या नाट्यमय घडामोडी तुम्हाला सई ताम्हणकरच्या ‘डेट विथ सई’ या आगामी वेबसीरिजमधून पाहता येतील.

झी5वर डिसेंबरपासून सुरू होणा-या ह्या वेबसीरिजविषयी सध्या खूप उत्कंठा आहे. ही मराठीतली पहिली थरार मालिका असणार आहे. ह्यामध्ये सई स्वत:च्याच म्हणजेच सई ताम्हणकरच्याच भूमिकेत असेल. सई ही पहिलीच भारतीय अभिनेत्री आहे, जी वेबसीरिजमध्ये स्वत:च्याच भूमिकेत दिसेल.

https://twitter.com/ZEE5India/status/1069859070457319424

Author

Recommended

PeepingMoon Exclusive