By  
on  

वर्कआउटनंतर ही अभिनेत्री सोशल मिडीयावर करते फोटो पोस्ट, जाणून घ्या काय आहे कारण

लॉकडाउनमध्ये घरात बसून बहुतांश लोक फिटनेसकडे लक्ष देऊ लागले आहेत. त्यासाठी घरात बसून वर्कआउट करण्याकडे कित्येयकांचा कल आहे. यातच कला विश्वातली कलाकार या काळात फिट राहण्यासाठी घरात वर्कआउट करताना दिसत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

This lockdown will only make you stronger. #wewillsurvivethis #letsfightback #stayfit #workout #stayathome

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

अभिनेत्री प्रिया बापटही तिच्या फिटनेसकडे लक्ष देते. सोशल मिडीयावर दररोज प्रियांचे फोटोही पाहायला मिळतात. हे फोटो असतात तिच्या वर्कआउट नंतरचे. प्रियाला वर्कआउट केल्यानंतरचे फोटो पोस्ट करायला का आवडतं याचं कारण तिने शेयर केलं आहे. नुकतच वर्कआउट केल्यानंतर तिने नेहमीप्रमाणे फोटो पोस्ट केला. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ती लिहीते की, “मला खूप छान वाटतं जेव्हा मी वर्कआउट केल्यानंतर फोटो पोस्ट करते. काहींना ते आवडतही नाही. पण तुमच्यापैकी बहुतांश लोकं मला कमेंट्समधून सकारात्मकता आणि प्रेरणा देतात. ज्याने मल प्रचंड ऊर्जा मिळते. सध्याच्या या कठीण समयी त्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे ज्या तुम्हाला प्रेरणा देतात आणि आनंदी ठेवतात. जे काही असेल पण तुम्ही ती 20 मिनीटे तरी स्वत:साठी द्या. आणि यात तुम्ही माझ्यासोबत असण्यासाठी धन्यवाद.”

प्रिया बापटचे हे फोटो पाहून कित्येकांना ती ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असेल यात शंका नाही.
 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive