By  
on  

'भाई व्यक्ती की वल्ली'चा उलगडला टीझर 2

'भाई व्यक्ती की वल्ली' या पु.लं देशपांडे यांची जीवनपट उलगडणा-या सिनेमाचा दुसरा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात पु.लंच्या बालपणीच्या काळातील रंजक चित्रण या टीझरमध्ये पाहायला मिळतंय. सिनेमात फक्त अभिनेता सागर देशमुखच पु.लं साकारत नाहीय तर अभिनेता सक्षम कुलकर्णीसुध्दा यात शालेय जीवनातले पु.लं साकारणार आहे. सक्षमने आत्तापर्यंत दे धक्का, काकस्पर्श यांसारख्या सिनेमांमधून तर आंबट-गोड, लव लग्न लोच्या मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

पु. लं म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व. आता आनंदाची बातमी म्हणजे पु.लंच्या जीवनावर आधारित सिनेमा येतोय. या सिनेमाची निर्मिती दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. महेश मांजरेकर यांच्या ‘फाळकेज् फॅक्टरी’ या निर्मिती संस्थेअंतर्गंत ‘भाई.. व्यक्ती की वल्ली’ या सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून भाईंच्या जीवनातील महत्वपूर्ण घटनांचा वेध घेता येणार आहे.

https://youtu.be/FDjBEK_NxQQ

 

'भाई व्यक्ती की वल्ली' हा सिनेमा पुढील वर्षी ४ जानेवारी २०१९ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive