By  
on  

क्रांती रेडकरने दिली डबल गुड न्यूज;जुळ्या मुलींना दिला जन्म

मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची आणि नृत्याची विशेष छाप पाडणारी अभिनेत्री क्रांती रेडकरने डबल गुड न्यूज दिल्या आहेत. क्रांतीने नुकताच दोन गोंडस मुलींना जन्म दिला आहे. मुंबईतील एका हॉस्पीटलमध्ये क्रांतीची प्रसूती झाली. दोन चिमुकल्या मुलींच्या आगमनाने क्रांती आणि तिच्या कुटुबियांमध्ये आनंदाला उधाण आलं आहे.

अभिनेत्री क्रांती रेडकर मागच्यावर्षी म्हणजे 2017 रोजी लग्नबेडीत अडकल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता, कारण क्रांतीने आपल्या लग्नाची बातमी जाहीर केली नव्हती. समीर वानखेडे या पोलिस अधिका-यासोबत एका खासगी सोहळ्यात ती विवाहबध्द झाली.

‘कोंबडी पळाली’ गाण्यामुळे घराघरांत क्रांती लोकप्रिय झाली.आपल्या दमदार अभिनयाने क्रांतीने सिनेसृष्टीत स्वत:चं एक वलय निर्माण केलं आहे. विनोदी किंवा गंभीर अशा दोन्हीही भूमिका ती नेहमी लिलया पेलते. ‘जत्रा’, ‘माझा नवरा तुझी बायको’,’मर्डर मेस्त्री’,’नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘ऑन ड्युटी 24 तास’, अशा सिनेमांमधून क्रांतीचा सदाबहार अभिनय पाहायला मिळाला.

तर ‘काकण’ या हद्यस्पर्शी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळून तिने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. क्रांती उत्तम नकलाकारसुध्दा आहे. बॉलिवूडमधील श्रीदेवी, हेमा मालिनी यांसारख्या अभिनेत्रींच्या उत्तम नकला ती करते.‘ट्रकभर स्वप्न’ हा क्रांतीची प्रमुख भूमिका असलेला सिनेमा  24 ऑगस्टला प्रदर्शित झाला होता.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive