By  
on  

स्नेहा चव्हाण आणि अनिकेत विश्वासराव यांची 'आली लग्नघटिका समीप'!

बॉलिवूडमध्ये जसे सध्या लग्नाचे वारे वाहतायत तसेच आता मराठी इंडस्ट्रीतसुध्दा वाहू लागले आहेत. मराठीतला मोस्ट एलिजिबल बॅचलर अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाण यांच्या हदयात समथिंग समथिंग वाजल्यानंतर दोघंही बोहल्यावर चढतायत. अनिकेत आणि स्नेहाच्या हळदी व मेहंदी समारंभातले काही फोटोज् नुकतेच सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. यात त्यांच्या लग्नसोहळ्यापूर्वीच्या या समारंभात त्यांनी प्रचंड धम्माल केली आहे. आता लवकरच ते लग्नबंधनात अडकतील.

दोन महिन्यांपूर्वीच या फ्रेश जोडीचा साखरपुडा मोठ्या थाटात पार पडला होता. दोघांचेही कुटुंबीय या लग्नसोहळ्यासाठी खुप उत्साहीत असल्याचे पाहायला मिळाले.

https://www.instagram.com/p/BrMhG8CnFGK/?utm_source=ig_share_sheet&igshid=172m0bdnvsr45

याआधी मराठी पिपिंगमून डॉट कॉमशी बोलताना स्नेहा म्हणाली होती,  “ हो,माझा आणि अनिकेतचा 5 ऑगस्ट रोजी पुण्यात साखरपुडा पार पडला. या खास सोहळ्याला फक्त नातेवाईक आणि जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थितीत होते.आमचं लग्न डिसेंबरमध्ये होणार आहे.आमचं हे अरेंज मॅरेज आहे. एकाच इंडस्ट्रीत आणि सहकलाकार असल्याने हे लव्ह मॅरेज आहे, की काय असा गैरसमज होऊ शकतो. पण तसं काही नाही. आमच्या कुटुंबियांनी या लग्नासाठी पुढाकार घेतला आहे."

https://www.instagram.com/p/BrKOoXzHhww/?utm_source=ig_share_sheet&igshid=15ad802499jrc

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive