By  
on  

Lockdown : वडिलांच्या पुण्यतिथीदिवशी लतादीदींनी दिलं १५ लाखाचं दान

वडील मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथीदिनी  करोना संकटाशी लढणा-या पोलिस, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी. सरकारी यंत्रणा आदींसोबतच देशवासियांना कळकळीचं आवाहन करण्यासोबतच लता दीदी यांनी पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथी निमित्त कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करता आलं नाही. मात्र या कार्यक्रमासाठीची खर्च होणारी रक्कम त्यांनी एका संस्थेला देत  वडिलांना आदरांजली अर्पण केली आहे. ट्विट करत लता मंगेशकर यांनी याविषयी माहिती दिली. 

लता दीदी म्हणतात, “आज, माझे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची ७८ वी पुण्यतिथी . मात्र देशावर करोनाचं संकट ओढवल्यामुळे आम्ही कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करु शकलो नाही याचं मला दु:ख आहे. पण यंदा त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आम्ही दीनानाथ फाउंडेशनच्या वतीने प्रीती पाटकर यांच्या प्रेरणा फाउंडेशनला पाच लाख रुपये आणि माझ्याकडून दहा लाख रुपयांचा निधी देत आहोत”

यापूर्वीसुध्दा लता दीदींनी सामाजिक भान जपत करोना संकटाशी लढणा-या सरकारला २५ लाखांची मदत केली होती आणि आता पुन्हा त्यांनी १५ लाखांची मदत देत वडिलांना आदरांजली वाहिली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive