By  
on  

'या जनावरांसाठी गोळ्याच! हिंम्मत नाही झाली पाहिजे परत!...' कलाकारांचा संताप

करोना संकटाशी लढताना पोलिस आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुक्षेसाठी रस्त्यांवर अहोरात्र झटत आहेत. अनेक पोलिसांना तर या संकटाशी दोन हात करताना करोना रोगाने विळखा घातला आहे.महाराष्ट्रात करोनामुळे मृत्यू पावलेल्या पोलिसांच्या संख्येतही वाढ होत आहे. तरीही जीवाची बाजी लावत पोलिस रस्त्याववर उतरतायत. पण तरीसुध्दा पोलिसांवरील हल्ले काही केल्या कमी होत नाहीत. पोलिसांवरील हल्ल्यांचे वृत्त दररोज पाहायला मिळते. 

 पुण्यातील  पिंपरीतील काळेवाडी येथे पोलिसांना मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर मराठी कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. अभिनेता हेमंत ढोमे आणि सोनाली कुलकर्णी यांनी  याबाबत संतापजनक ट्विट करत या दुर्देवी घटनेचा निषेध केला आहे. हेमंत ट्विटमध्ये म्हणतो,"बंदुक द्या पोलीसांना! काठ्या माणसांसाठी असतात... या जनावरांसाठी गोळ्याच! हिंम्मत नाही झाली पाहिजे परत "

तर सोनाली कुलकर्णीने ट्विटरवर म्हटलंय," हिंम्मत होतेच कशी ? एकीकडे आम्ही पोलिसांना मानवंदना देतोय आणि दुसरीकडे हे मानव ??? मानवंच म्हणायचं ना यांना ? लगेच जेल मध्ये घाला"

 

तहान-भूक विसरुन पोलिस उन्हातान्हात नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. त्यांच्या कामाचे तास अविरत आहेत. आपण या लॉकडाऊनमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहावं म्हणून ते त्यांच्या कुटुंबाला सोडून आपली काळजी घेतायत. त्याचं मनोधैर्य वाढवण्याची एक सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. पोलिसांच्या पाठीशी सदैव उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive