By  
on  

सिनेमा आणि ट्विटर हे यापुढे  चार्मिंग आणि विनोदी नसतील – सई ताम्हणकर 

प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर यांच्या जाण्यानं त्यांच्या चाहत्यांसह कला विश्वातही हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनेता इरफान आणि त्यानंतर ऋषी कपूर या दोन मोठ्या कलाकारांना गमावल्यानंतर काही लोक सोशल मिडीयावर 2020 या वर्षालाही दोष देऊ लागलेत. सोशल मिडीयावर कलाकारही विविध पद्धतिने व्यक्त होताना दिसत आहेत. अर्थात हे त्यांचं ऋषी कपूर यांच्याप्रती असलेलं प्रेम आणि आदर आहे. 
अभिनेत्री सई ताम्हणकरलाही दु:ख अनावर झालं. तिने सोशल मिडीयाच्या माध्यमातून ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सई तिच्या ट्विटमध्ये म्हणते की, “सिनेमा आणि ट्विटर हे यापुढे चार्मिंग आणि विनोदी नसतील ”

ऋषी कपूर यांच्यासारख्या हँडसम आणि चॉकलेट बॉय अभिनेत्याने हिंदी सिनेसृष्टीत चार्म आणला होता. आजपर्यंत त्यांच्या कामात तो चार्म जाणवायचा. शिवाय सोशल मिडीयावरील ट्विटर या प्लॅटफॉर्मवर तर ते प्रचंड एक्टिव्ह होते. त्याचे ट्विट्स हे चर्चेचा विषय असायचे आणि आपसुकच त्यांच्या ट्विटमुळे चेहऱ्यावर हास्य यायचं. मात्र त्यांच्या जाण्यानं सिनेमा इंडस्ट्रीसह ट्विटरवरही त्यांचा चार्म आणि विनोदी अंदाज यापुढे पाहता येणार नाही. आणि म्हणून सईने असं ट्विट करून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 
सईसह बरेच मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार त्यांच्या भावना सोशल मिडीयावर व्यक्त करत आहेत आणि ऋषी कपूर यांना श्रध्दांजली वाहत आहेत. या लाडक्या अभिनेत्याला अलविदा म्हणताना नक्कीच कित्येकांचे डोळे पाणावले असतील. 

Recommended

PeepingMoon Exclusive