By  
on  

 गश्मीर महाजनीने नृत्यातून अशा व्यक्त केल्या भावना 

सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी सकारात्मकता गरजेची आहे. सोशल मिडीयावर ही सकारात्मकता पाहायला मिळतेय. विविध व्हिडीओच्या माध्यमातून कलाकार सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिनेता गश्मीर महाजनी देखील सध्या विविध व्हिडीओ करतोय. त्याच्या सोशल मिडीया पोस्टमध्ये कधी  तो डान्सचे, व्यायामाचे व्हिडीओ पोस्ट करतो. 

नुकताच गश्मीरने आणखी एक डान्स व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये गश्मीर 'मनी हाईस्ट' या प्रसिद्ध वेब सिरीजच्या गाण्यावर डान्स करतोय. फक्त गश्मीरचं नाही तर त्याच्या डान्स क्लासेसची मंडळीही या व्हिडीओत  आहेत. गश्मीरचे नृत्याचे क्लासेस देखील आहेत. आणि याच त्याच्या डान्स टीमसोबत मिळून त्याने हा व्हिडीओ केला आहे. सध्याच्या परिस्थितीवर आपण कशी मात करतोय असा विषय घेऊन हा व्हिडीओ तयार केला आहे. गश्मीरचा हा सकारात्मक व्हिडीओ घरी बसलेल्या सगळ्यांना ऊर्जा देईल यात शंका नाही. या व्हिडीओसोबतच गश्मीरने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive