लॉकडाउनमध्ये सध्या सगळे घरीच आहेत. यानिमित्ताने कुटुंबांसोबत वेळ घालवण्याची संधी सगळ्यांना मिळाली आहे. मात्र सध्याच्या परिस्थिती स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं आहे हे तेवढच खरय. त्यातच जरी घरात बसूनच एखादी दुखापत झाली तर तारांबळ उडणार एवढं नक्की. अभिनेता श्रेयस तळपदेच्या बाबतीतही असच काहीसं झालेलं दिसतय.
श्रेयसने नुकताच एक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या फोटोत श्रेयसच्या उजव्या डोळ्याला काहीतरी दुखापत झाल्याचं पाहायला मिळतय. त्याने त्याच्या उजव्या डोळ्याला बँडेज लावलेली पाहायला मिळतय. शिवाय पोस्टच्या कॅप्शनमध्ये श्रेयस लिहीतो की, “पायरेट्स ऑफ द क्वारंटाईन. नाही मी मास्क चुकीच्या जागी नाही लावलाय. पण तुम्ही सांगू शकता का की नेमकं काय झालय ते ?
तर श्रेयसने त्याला काय झालय हे न सांगता नेटकऱ्यांनाच चक्क प्रश्न विचारला. मात्र पिपींगमून मराठीला मिळालेल्या माहितीनुसार मुलीसोबत खेळताना श्रेयसच्या डोळ्याला मुलीचा नख लागल्याने त्याला छोटीशी दुखापत झाल्याचं कळलय. ही छोटीशी दुखापत असल्याचं बोललं जातय. मात्र श्रेयसचा डोळा लवकर बरा होऊ देत हीच त्याच्या चाहत्यांची देखील इच्छा आहे.
मात्र श्रेयसच्या पोस्टवर विविध कलाकारांचेही कमेंट्स येऊ लागले आहेत. काळजीपोटी ते देखील श्रेयसच्या डोळ्याला नेमकं काय झालय असा प्रश्न त्यांनाही पडलाय.