'सोयरे सकळ' हे नवंकोरं नाटक लवकरच नाट्य रसिकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाचं विशेष म्हणजे याच्या फर्स्ट लूकवरुनच या नाटकात कलाकरांची मांदियाळी असल्याचं पाहायला मिळतंय. या नाटकाच्या पोस्टरवरून अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, आशुतोष गोखले, अश्विनी कासार, आदित्य इंगळे, अनुया बेचे, सुनील तांबट आदी कलाकार प्रमुख भूमिकेत असल्याचं लक्षात येत आहे. या नाटकाच्या फर्स्ट लूक वरुन व कलाकारांच्या पेहरावावरुन हे नाटक 70-80 दशकात घडत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे या नाटकाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
'सोयरे सकळ' या नाटकाचे लेखन डॉ. समीर कुलकर्णी यांचे असून दिग्दर्शन आदित्य इंगळे यांचे आहे. नाटकाची नेपथ्य आणि प्रकाशयोजना प्रदीप मुळ्ये यांची असून अजित परब यांनी या नाटकाला संगीत दिले आहे.
'संगीत देवभोळी'नंतर भद्रकाली प्रॉडक्शनची 'सोयरे सकळ' ही 56 वी अभिजात नाट्यकृती आहे.
https://www.instagram.com/p/Brbx3F4BSOL/
अभिनेत्री अश्विनी कासार हिने आपल्या इंस्टाग्राम अकांउटवरुन या नाटकाचे हे पोस्टर शेअर केले आहे. येत्या 22 डिसेंबरला 'सोयरे सकळ' नाटकाचा शुभारंभ प्रयोग पार्ले येथील दिनानाथ नाट्यगृहात संपन्न होणार आहे.