By  
on  

अभिनेता सुमीत राघवनने असा वाचवला पक्ष्याचा जीव, सलग दुसऱ्यांदा केलं रेस्क्यू

 सध्याच्या लॉकडाउनच्या काळात घरात बसून विविध गोष्टी करण्यासाठी बराच वेळ मिळालेला आहे. बहुतांश लोकं या वेळेचा सदुपयोग करत आहेत. कला विश्वातील कलाकारही घरात बसूनच काहीना काही करत आहेत. 

अभिनेता सुमीत राघवनला प्राण्यांची प्रचंड आवड आहे. तो प्राणीप्रेमी असून कुटुंबासोबतच तो प्राण्यांसोबतही वेळ घालवतो. मात्र नुकताच सुमीत या मुक्या जनावरांच्या मदतीला धावून आला आहे.  एका मांजरीचं पिल्लू त्याला घराजवळ सापडलं त्याला त्यानं घरात आणलं. आणि तिची काळजी घेतली. शिवाय नुकतच त्याने एका पक्षीचाही जीव वाचवला आहे. एशियन कोयल एका पतंगाच्या मांझ्याला अडकून पडली होती. तिचा जीवही सुमीतने त्याच्या एका मित्राच्या मदतीने वाचवला आहे. 

या प्राणीमात्रांवर जीव लावणाऱ्या सुमीत राघवनने या मुक्या प्राण्यांवर दाखवलेलं प्रेम पाहून त्याचं विशेष कौतुक सोशल मिडीयावर होत आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive