By  
on  

'रंकाळा, जिलेबी आणि विजय-अपूर्वाचं जुळता जुळता जुळलंय की...'

कालपर्यंत कोल्हापूरमधील रंकाळा तलाव हा पर्यटकांसाठी फिरण्याचा, करमणुकीचा स्पॉट होता पण सोनी मराठीवरील अपूर्वा आणि विजय यांचं जुळल्यापासून आता या रंकाळा स्पॉटला प्रेमाचं रुप मिळालंय. ‘जुळता जुळता जुळतंय की’ ही मालिका आता मनोरंजक वळणावर पोहचली आहे. रंकाळ्यासारख्या नयनरम्य ठिकाणी विजय आणि अपूर्वा यांनी एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली दिली. प्रेम युगलांसाठी आता आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी रंकाळा हे ठिकाण प्रसिध्द होणार आहे. प्रत्येकाच्या प्रेम-भावना व्यक्त होत असताना कोल्हापूरचा रंकाळा तलाव प्रेमाचा साक्षी होणार आहे.
‘जुळता जुळता जुळतंय की’मध्ये विजयने अपूर्वाला केलेले प्रपोज अगदी लाजवाब होते. स्पेशल थाटात आणि जिलेबीच्या ताटात केलेलं हे पहिलं खास प्रपोज नक्कीच असेल. जिलेबीमधून लिहलेलं ‘माझ्याशी लग्न करणार?’ अशी मागणी घालणं ते देखील रंकाळा तलावात...यातूनच त्याने कोल्हापूरी बाज जपल्याचं सिध्द झालं आहे, असंच म्हणावं लागेल. ‘माझ्याशी लग्न करणार?’ अशी विजयने अपूर्वाला मागणी घातल्यावर एकही शब्द न उच्चारता ‘प्रश्नचिन्ह’ उचलून अपूर्वाने अगदी अलगदपणे आणि प्रेमाने तिचा होकार कळवला. प्रेमाने जगही जिंकता येतं असं आपण म्हणतो पण सोनी मराठी आणि विजय-अपूर्वा यांच्या प्रपोज स्टाईलने तर महाराष्ट्रातील प्रेक्षकांचं मन जिकंलंय हे नक्की!
विजयच्या मनातलं प्रेम अपूर्वाच्या हदयाल भिडलंय आणि शेवटी काय तर यांचं जुळता जुळता जुळलंय की... आता प्रेक्षकांना उत्सुकता फक्त त्यांच्या लग्नाची आणि लग्नात आख्या गावाला ते जिलेबी वाटणार का पाहण्याची. आता प्रेमकथेचा साक्षीदार होण्यासाठी तुम्ही पाहात राहा,जुळता जुळता जुळलंय की.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive