जुन्या आठवणींमध्ये डोकावणं आणि त्यातून ते सोनेरी क्षण पुन्हा अनुभवणं याजी मजा काही वेगळीच असते. लॉकडाउनमध्ये कित्येक कलाकार सध्या हेच करत आहेत. जुने फोटो, त्या फोटोतल्या आठवणी आणि काही खास क्षण यातून मिळणारा आनंद त्यांना सुखावतोय. अभिनेता श्रेयस तळपदेनेही त्याच्या काही जुन्या आठवणी सोशल मिडीयावर पोस्ट केल्या आहेत.
नुकताच श्रेयस तळपदे एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो आहे त्याचा पहिला मराठी सिनेमा ‘भेट’ मधील. हा फोटो पोस्ट करत श्रेयस लिहीतो की, “ही आठवण मला 2001मध्ये घेऊन जाते. माझी पहिली मराठी फिल्म ‘भेट’. हा सिनेमा चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केला होता. प्रतिक्षा लोणकर या सह कलाकार होत्या. ज्यांनी 2005 मधील ‘इक्बाल’ मध्ये माझ्या आईची भूमिका साकारली होती.”श्रेयससह कित्येक कलाकार सोशल मिडीयावर त्यांच्या करियरमधील जुन्या आठवणी शेयर करत आहेत.