By  
on  

'चुकीला माफी नाही',आता दुसऱ्यांदा अनुभवा डॅडींचा दरारा

मराठी सिनेसृष्टीतही आता सुपरहिट चित्रपटांचा सिक्वल बनवण्याची प्रथा हळूहळू रूढ होऊ लागली आहे. संगीता अहिर निर्मित आणि चंद्रकांत कणसे दिग्दर्शित २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दगडी चाळ' या चित्रपटाला घवघवीत यश मिळालं. गॅंगवॉर हा जरी चित्रपटाचा केंद्रबिंदू असला तरी हळुवार फुलत जाणारी प्रेमकथाही त्यात होती. चित्रपटाचे रोमांचकारी कथानक, दमदार संवाद, सुमधुर गीते आणि कलाकारांचा जबरदस्त अभिनय या सगळ्याच गोष्टी अतिशय उत्तम जुळून आल्या होत्या.

मुंबईतील दगडी चाळ सर्वश्रुतच आहे. तिथला रुतबा अनेकांना हादरवतो. त्यामुळे हाच दरारा कायम ठेवत संगीता अहिर मुव्हीजचा 'दगडी चाळ 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात काय नवीन पाहायला मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेच. शिवाय या चित्रपटाचे आणखी एक वैशिट्य म्हणजे हा चित्रपट ज्या व्यक्तीवर आधारित आहे, त्या 'डॅडीं'ची कन्या योगिता गवळी खुद्द या सिनेमाच्या सहनिर्मितीची धुरा सांभाळत आहे. त्यामुळे आता 'दगडी चाळ 2'ही प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक ठरेल, यात शंकाच नाही.

अर्थात या चित्रपटात कोणाची वर्णी लागली आहे, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात असले तरी या चित्रपटाची निर्मितीही संगीता अहिरच करणार आहेत. पहिल्या चित्रपटाप्रमाणे 'दगडी चाळ 2'चं दिग्दर्शनही चंद्रकांत कणसे करणार असल्यानं पुन्हा प्रेक्षकांना काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. नवीन वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

 

https://youtu.be/RnVxPR3eefg

Author

Recommended

PeepingMoon Exclusive