By  
on  

अभिनेत्री निवेदिता सराफ दिसणार या भूमिकेत

आपल्या कसदार अभिनयाने, सात्विक सौंदर्याने आणि मनमोहक हास्याने गेली काही दशकं प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करणारा एक मराठी चेहरा पुन्हा एकदा हिंदी मालिकेच्या पडद्यावर झळकणार आहे.

अनेक मराठी सिनेमे आणि नाटकांमधून स्वतःच्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवल्यानंतर अभिनेत्री ‘निवेदिता सराफ’ कलर्स हिंदी वरील ‘केसरीनंदन’ या मालिकेत ‘रानीदेवी’ या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दोन वर्ष एका सुप्रसिद्ध मराठी मालिकेत काम केल्यानंतर पुन्हा एकदा हिंदी मालिकेच्या माध्यमातून ‘निवेदिता सराफ’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. स्त्रियांचं विश्व चूल आणि मूल इतकंच मर्यादित ठेवणाऱ्या समाजातली एका पेहलवानाची छोटी मुलगी एक भव्य स्वप्न पहाते आणि भविष्यात महिला कुस्तीगीर म्हणून प्रसिद्धी मिळवत, ते स्वप्न सत्यात उतरवते. त्या मुलीचा संघर्ष ‘केसरीनंदन’ या मालिकेतून पहायला मिळणार आहे.

‘मालिकेची कथा राजस्थानच्या धरतीवर घडणार असल्यामुळे माझी वेशभूषा ही पारंपारिक राजस्थानी स्त्री प्रमाणेच असून आमच्या प्रॉडक्शन हाउस ने वेशभूषा आणि सेट यावर खूप मेहनत घेतली आहे. सेटवरचे सगळेच कलाकार मनमोकळे आहेत, एकत्र काम करताना आम्ही खूप धमाल करतो, त्यामुळे मालिकेच्या सेटवर अगदी घराप्रमाणे खेळीमेळीचं वातावरण असतं. या मालिकेत कुटुंबाच्या सुखासाठी, आनंदासाठी झटणाऱ्या स्त्रीची भूमिका मला साकारायची आहे. पण त्याचसोबत स्त्रियांकडे बघण्याच्या पारंपारिक दृष्टीकोनाला छेद देणाऱ्या अशा मालिकेचा एक भाग असणं ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे’, अशा भावना निवेदिता सराफ यांनी व्यक्त केल्या.

कलर्स हिंदी वरच्या ‘केसरीनंदन’ मालिकेत निवेदिता सराफ या मानव गोहिल आणि अंकित अरोरा या दोघांच्या आईची भूमिका साकारणार आहेत.

https://twitter.com/ColorsTV/status/1076007153029197824

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive