लॉकडाउनच्या या काळात मनोरंजन विश्वातील चित्रीकरण, कामं बंद आहेत. पण कलाकार मंडळी घरात बसूनही काहीना काही गोष्टी करत आहेत. बहुतांश कलाकार त्यांचे व्हिडीओ बनवून सोशल मिडीयावर पोस्ट करत आहेत. तर काही कलाकार त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.
अभिनेता श्रेयस तळपदेनेही त्याची एक जुनी आठवण शेयर केली आहे. नुकताच श्रेयसने त्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तो या खास आठवणीविषयी सांगतो. ही आठवण आहे त्याने काम केलेल्या एका नाटकाची. या नाटकाच्या निमित्ताने श्रेयसने पहिल्यांदाच दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. यात त्याने पंजाबी पुरुषांच्या दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. या व्हिडीओत या भूमिकांची झलकही श्रेयसने करुन दाखवली आहे. शिवाय या नाटकाचे काही फोटोही या पोस्टमध्ये दिसत आहेत. या पोस्टमध्ये श्रेयस लिहीतो की, “1996 मध्ये मी केलेल्या या एका नाटकातील ही मजेशीर आठवण आहे. ज्यात मी पहिल्यांदाच दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. ”
या व्हिडीओत श्रेयसने या नाटकाची खास आठवण शेयर केली आहे. तेव्हा या लॉकडाउनमध्ये श्रेयससुद्धा त्याच्या जुन्या आठवणींमध्ये रमलेला दिसतोय.