By  
on  

पाहा व्हिडीओ: सचिन तेंडुलकरला बाळासाहेबांची आठवण येते तेव्हा

जमलेल्या तमाम हिंदू बंधू-भगिनींनो ही एक सिंहगर्जना ऐकताच जमलेल्या शेकडो हिंदूंचा उर अभिमानाने फुलून यायचा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नाव जरी कोणी घेतलं किंवा आठवलं तरी उत्साह व चैतन्य संचारतं. पण नुकतंच क्रिकेटच्या देवाने म्हणजेच मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने बाळासाहेबांच्या अविस्मरणीय आठवणी जागवल्या आहेत.

बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनपट उलगडणारा 'ठाकरे' नावाचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या सिनेमात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका हरहुन्नरी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारली आहे. सिनेमा जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे मात्र या सिनेमाचा ट्रेलर २६ डिसेंबरला पाहायला मिळणार आहे. याच संदर्भातला सचिनचा तेंडुलकरचा एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे.

याच खास व्हिडिओमध्ये खासदार संजय राऊत, अभिनेता अजिंक्य देव आणि इतर काही शिवसैनिक आणि सामान्यांच्याही प्रतिक्रिया दाखवण्यात आल्या आहेत. सचिन तेंडुलकर व्हिडीओत सांगतो," जेव्हा आम्ही शिवाजी पार्कवर क्रिकेटची प्रॅक्टीस करायचो त्यावेळेस बाळासाहेबांच्या अनेक सभा तिथे होत असत, त्यामुळे त्यांचा तो झंझावात मला अनुभवता आला. तसंच ते मला नेहमी म्हणायचे देशाचं नाव तु उज्जवल कर."

https://youtu.be/A7i528HMwN0

Author

Recommended

PeepingMoon Exclusive