By  
on  

 बॉयफ्रेंड ऋषि सक्सेनासोबत ईशाने दिली या प्रश्नांची उत्तरं

सोशल मिडीयावर सध्या विविध चॅलेंजचं फॅड सुरु आहे. यातच व्हू इज हे चॅलेंज ट्रेंडमध्ये आहे. या चॅलेंज कपलसोबत केलं जातं. या चॅलेंजमध्ये दोघही जोडीदार डोळे बंद करून हातांच्या इशाऱ्याने एकमेकांवर हातवारे करून समोरून येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देतात.

नुकतच हे चॅलेंज केलं आहे अभिनेत्री ईशा केसकर आणि बॉयफ्रेंड अभिनेता ऋषि सक्सेनाने. या चॅलेंजमध्ये विचारल्या गेलेल्या विविध प्रश्नांची उत्तर दोघांनी दिली आहेत. या लॉकडाउनमध्ये सध्या दोघही एकत्र आहेत. आणि यावेळे एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.
या पोस्टमध्ये इशा लिहीते की, “कोण जास्त एक्स्ट्रा आहे? मी आहे, कोण अशे व्हिडीओज करण्यासाठी जबरदस्ती करतं ? मी करते.” असं मजेशीर कॅप्शन लिहीत या व्हिडीओसाठी इशाने ऋषिला जबरदस्ती केली असल्याचं ती या पोस्टमध्ये म्हणतेय.

या कपलच्या पोस्टवर सगळ्यांचच लक्ष असतं. हे गोंडस कपल त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत असतात. आणि नुकताच केलेला हा चॅलेंज व्हिडीओही त्यांच्या चाहत्यांना आवडतोय. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं रिलेशनशीपमध्ये आहेत. मात्र त्याविषय़ी कोणता खुलासा न करता सोशल मिडीयाच्या माध्यमातून आणि विविध कार्यक्रमांना दिसणारी एकत्र उपस्थितीवरून यांची जवळीक समोर आली. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive