By  
on  

 अभिनेत्री अमृता खानविलकरने अप्सरेला अशा दिल्या शुभेच्छा, या सिनेमात झळकल्या होत्या दोघी 

अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला आज वाढदिवसाच्या निमित्ताने विविध पद्धतिने शुभेच्छा मिळत आहेत. सिनेसृष्टीतीलही काही जवळची मित्र मंडळी आणि कलाकार तिला वाढदिवासाच्या शुभेच्छा देत आहेत. त्यातच एक अशी अभिनेत्री जिच्यासोबत सोनाली क्वचितच दिसली असेल त्या अभिनेत्रीनेही सोनालीला वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ही अभिनेत्री आहे अमृता खानविलकर.


सोनालीच्या वाढदिवसानिमित्त अमृताने सोनालीसोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत दोघीही सुंदर दिसत आहे आणि फोटो फारच जुना असल्याचही कळतय. हा फोटो पोस्ट करत अमृता लिहीते की, “तू सोना है रे सोना, वाढदिवसाच्या शुभेच्छा, जुनं ते सोनं.” असं म्हणत अमृताने सोनालीसोबतची ही खास आठवण शेयर केली आहे. 

'नटरंग' या प्रसिद्ध गाजलेल्या सिनेमात या दोघी होत्या. एकीकडे या सिनेमातील 'अप्सरा आली' हे गाणं खूप चर्चेत आलं तर याच सिनेमातील अमृता खानविलकरच्या 'वाजले की बारा' या गाण्यालाही पसंती मिळाली आणि ते गाणही खूप गाजलं. ही दोन्ही गाणी हिट झाली आणि आजही या गाण्यासाठी दोघींचं कौतुक होतं. 
या दोन्ही सुंदर, गुणी आणि उत्तम अभिनेत्रींना स्क्रिनवर कधी एकत्र पाहता येईल यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive