By  
on  

सोनाली आहे सईची टी पॅक्ड फ्रेंड, अशा दिल्या शुभेच्छा

सोशल मिडीयावर आज सगळीकडे अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीचे फोटो पाहायला मिळत आहे. निमित्त आहे तिच्या वाढदिवसाचं. मनोरंजन विश्वातील विविध कलाकारांनी तिला या निमित्ताने शुभेच्छा देणारे मेसेज सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. शिवाय सोनालीसोबतचे त्यांचे फोटो आणि खास आठवणीही शेयर केल्या आहेत.अभिनेत्री आणि सोनालीची मैत्रीण सई ताम्हणकरनेही सोनालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सईने सोनालीसोबत काही फोटो पोस्ट करते तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सई आणि सोनाली या आत्तापर्यंत ‘हाय काय नाय काय’, ‘क्लासमेट्स’, ‘धुरळा’ या सिनेमांमध्ये एकत्र दिसल्या होत्या. ‘धुरळा’ या सिनेमांमधील त्यांच्या भूमिकाही प्रेक्षकांना आवडल्या होत्या. या दोन्ही गुणी अभिनेत्रींना ऑफस्क्रिन आणि ऑनस्क्रिन एकत्र पाहायला चाहत्यांना आवडतं. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive