By  
on  

 सोनाली कुलकर्णीने फियान्से कुणालसोबत असा साजरा केला वाढदिवस

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या वाढदिवसाला सगळ्यांनाच एक आनंदाची बातमी दिली आहे. ही बातमी म्हणजे तिच्या साखरपुड्याची. याचवर्षी 2 फेब्रुवारी रोजी सोनाली आणि फियान्से कुणाल यांचा साखरपुडा झाला होता. या साखरपुड्याची बातमी आणि साखरपुड्याचे फोटो सोनालीने पोस्ट केले. आणि वाढदिवसाच्या शुभेच्छांसह सोनालीवर साखरपुडाच्याही शुभेच्छांचा वर्षाव झाला. 


सध्या सोनाली कुणालसोबत दुबईत आहे. दुबईत सोनालीने तिचा वाढदिवस साजरा केला आहे. या वाढदिवसाला सोनालीला खास गिफ्टही मिळालं आहे. शिवाय तिने साखरपुड्याची बातमी देऊन चाहत्यांना रिटर्न गिफ्टही दिलं आहे. नुकतच तिने तिच्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत सोनालीला तिचे गिफ्ट उघडत असताना कुणालही सोबत आहे. ही गिफ्ट आहे कॅरमबोर्डचं. हे गिफ्ट सोनालीला कुणालकडून मिळाल्याचं पाहायला मिळतय.


शिवाय या वाढदिवसाच्या निमित्ताने सोनालीने स्वादिष्ट केकही कापला. या केकसोबतचे व्हिडीओही तिने पोस्ट केले आहेत. कुणालनेही सोनालीसोबतच सुंदर फोटो पोस्ट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय दोघांनी वाढदिवसानिमित्ताने खास डिनरही केलं आहे. या दरम्यानचा फोटोही कुणालने पोस्ट केला आहे.


कुणाल हा दुबईत बिझनेसमन म्हणून काम करत असल्याचं बोललं जातय. पण त्याच्याविषयी अधीक माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या या गोंडस कपलची सोशल मिडीयावर सगळीकडे चर्चा आहे. दोघांचे साखरपुड्याचे फोटो तर सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. 
 

Recommended

PeepingMoon Exclusive