By  
on  

अमोल कोल्हे म्हणतो, 'लेक माझी लाडकी'

अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांच्या अभिनयाने सजलेली स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका घराघरांत लोकप्रिय आहे. लहान-थोर कुटुंबातील सर्वचजण इतिहासातील ते सुवर्णयुग या मालिकेच्या निमित्ताने अनुभवतायत. पण या मालिकेत नुकताच प्रवेश केलेली स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराची भूमिका साकारणारी बालकलाकार कोण आहे. ही बालकलाकार आहे, अमोल कोल्हे यांची कन्या आद्या कोल्हे.

आपल्या मुलीसोबत स्क्रीन शेअर करण्याच्या अनुभवाविषयी अमोल कोल्हे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. ते म्हणतात, "कालपर्यंत "दमलेल्या बाबाची कहाणी" ऐकून हळवी होणारी पोर जेव्हा बाबा का दमतो हे जाणून घेते..... एक दडपण येतं जेव्हा तुमचा सहकलाकार चोख पाठांतर, expressions, action continuity आणि sincerity मध्ये तोडीस तोड असतो आणि मुख्य म्हणजे "हे चुकलं" असं बिनधास्त सांगू शकतो..." आद्या तुझ्यासोबत काम करताना मला खुप अभिमान वाटतोय,अमोल कोल्हे यांनी नमू द केलं आहे.

 

https://www.facebook.com/dr.amolkolhe1/posts/2478117185538134

 

आद्याचा हा पहिलाच स्क्रीन अपिअरन्स असल्याने तिचे बाब अमोल कोल्हे यानिमित्ताने आणखी उत्सुक दिसले. आत्ता आद्याच्या मालिकेच्या प्रवेशानंतर यात आणखी काय नाट्यमय घडामोडी घडणार हे पाहणं, औत्सुक्याचं ठरणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive