By  
on  

या तीन अभिनेत्री एकत्र झळकल्या या व्हिडीओत, घरात बसून तयार केला व्हिडीओ

सध्या लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वातील चित्रीकरणाची कामं बंद आहेत. त्यामुळे मनोरंजन विश्वातील कलाकारही घरातच आहेत. मात्र बहुतांश कलाकार घरात बसून काहीना काही व्हिडीओ तयार करत आहेत. यातच अभिनेत्री तितीक्षा तावडे, खुशबू तावडे आणि गौरी नलावडे या अभिनेत्री एकत्र राहत आहेत. या तिघी घरात बसून एकत्र मिळून विविध व्हिडीओ तयार करत आहेत.

 

नुकताच या तिन्ही अभिनेत्रींनी मिळून तयार केलाय लॉकडाउन विथ फ्रेंड्स हा नवा व्हिडीओ. या व्हिडीओत त्यांनी विविध कॅरेक्टर्स तयार करून घरात एकत्र असताना घरातली कामं कशी होतात हा  विषयी घेऊन मजेशीर व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंत केलं आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive