By  
on  

संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

संजय जाधव ह्यांनी आपल्या लकी सिनेमाची घोषणा केल्यावर त्यामधले कलाकार कोण असतील ह्याविषयी सिनेसृष्टीत प्रचंड उत्सुकता होती. सई ताम्हणकर, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, सिध्दार्थ जाधव यांपैकी सिनेमात कोणाची वर्णी लागणार याबाबत प्रचंड चर्चा रंगली होती.

पण अखेर अभिनेता अभय महाजन आणि अभिनेत्री दिप्ती सती आपल्या सिनेमाचे हिरो-हिरोइन असल्याची घोषणा संजय जाधव ह्यांनीच केली. आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. नवीन वर्षात 7 फेब्रुवारीला ‘लकी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. संजय जाधव यांचे चाहते या सिनेमाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

दुनियादारी, तू हि रे, प्यारवाली लव्हस्टोरी, गुरू, येरेयेरे पैसा अशा सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन केलेल्या संजय जाधव ह्यांच्या लकी सिनेमातून साऊथ सिनेमा गाजवलेली अभिनेत्री दिप्ती सती डेब्यू करत आहे. अभय महाजन आणि दिप्ती सती सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत दिसतील.

फिल्ममेकर संजय जाधव म्हणतात, “ व्हॅलेंटाईन्सच्या महिन्यात रिलीज होणारा आमचा रोमँटिक-कॉमेडी सिनेमा तरूणाईला खूप आवडेल, असा आमचा विश्वास आहे. तुमच्या संपूर्ण कुटूंबासोबत तुम्ही हा सिनेमा पाहू शकाल आणि तुमचं दोन तास भरपूर मनोरंजन होईल, ह्याची मला शाश्वती आहे.”

या सिनेमाचं वैशिष्ठ्य म्हणजे, आपल्या कलाकारांना लाँच करताना संजय जाधव यांनी एक गाणंच लॉंच केलं होतं. ‘अहो, दादा आता सांगा नंबर कुणाचा आला’ या गाण्याने धमाल उडवून दिली होती. या सिनेमाच्या कथानकाविषयी आणि कलाकारंविषयीची सविस्तर माहिती अद्यापतरी गुलदस्त्यातच असल्याने सर्वचजण सिनेमाच्या टीझरची आतुरतेने वाट पाहतायतय

'बी लाइव्ह प्रॉडक्शन्स' आणि 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन' निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, अभय महाजन आणि दिप्ती सती ह्यांच्या अभिनयाने सजलेला,  संजय जाधव दिगदर्शित 'लकी' चित्रपट 7 फेब्रुवारी  2019  ला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

https://youtu.be/eqYQtUUfi1M

Recommended

PeepingMoon Exclusive