सई मांजरेकरच्या आजोबांचं निधन, मांजरेकर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर

By  
on  

अभिनेत्री आणि दिग्दर्शक अभिनेता मंहेश मांजरेकर यांच्या पत्नि मेधा मांजेरकर यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. त्यांचे वडिल हे एक गणिततज्ञ होते. महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या, मुलगी सई आणि मानलेली मुलगी गौरी यांनी आजोबांच्या निधनाने सोशल मिडीयावर दु:ख व्यक्त केलय आणि त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. मेधा मांजरेकर यांनीही वडिलांसोबतचा फोटो पोस्ट करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

त्या म्हणतात की, “तुम्ही जरी आम्हाला सोडून गेला असाल तरी तुम्ही आमच्या ह्दयात कायम जिवंत आहात. लक्षातच नाही आलं की तुम्ही एक सेलिब्रिटी होता. तुमच्या विद्यार्थ्यांचे आणि नातेवाईकांचे प्रचंड मेसेज येत आहेत. मी आज जे काही आहे त्याचं श्रेयं तुम्हाला देते बाबा.” असं म्हणत मेधा यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Ajoba️ will miss you always.

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar) on

शिवाय सत्या मांजरेकर, सई मांजरेकर, गौरी इंगवले यांनीही त्यांच्या या लाडक्या आजोबांसोबतचे फोटो आणि काही व्हिडीओतील आठवणी शेयर करत त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

त्यांना पिपींगमून मराठीकडून भावपूर्ण श्रध्दांजली.

 

Recommended

Loading...
Share