By  
on  

सेम टू सेम कुर्ती आणि क्रांतिचं मीम्स, ही एक्सपेक्टेशन Vs रिएलिटी पाहिली का ?

सोशल मिडीया म्हटलं की सध्या मिम्सचा जणू पाऊसचं असतो. विविध ट्रेंडिंग गोष्टींवर तयार केलेल मिम्स व्हायरल होत असतात. यात अभिनेत्री क्रांति रेडकरनेही एक भन्नाट मीम तयार केलय.अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकताच तिचा एक सुंदर फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला. या फोटोत अमृताने सुंदर पिवळ्या रंगाचा कुर्ती तिने परिधान केली आहे. मात्र अशीच सेम टू सेम कुर्ती आहे अभिनेत्री क्रांति रेडकरकडे. आणि म्हणूनच क्रांतिने या सेम कुर्ती मधील फोटोचं एक मीम तयार केलय. क्रांतिने तिचा प्रेग्नंसी दरम्यानचा फोटो यात कोलाज केला आहे. या मजेशीर पोस्टच्या कॅप्शनमध्ये क्रांति लिहीते की,  “मी स्वत:ला हे करण्यापासून थांबवू शकले नाही. मी माझ्या बचावासाठी सांगतेय की हा फोटो मी प्रेग्नेंट असतानाचा आहे. तू खूप सुंदर आहेस डॉल.”

क्रांतिने या फोटोचं एक्सपेक्टेशन वर्सेस रिएलिटी असं मीम तयार केलं आहे. अमृतानेही ही पोस्ट पाहून पोस्टवर कमेंट केली आहे. लॉकडाउनच्या या काळात सध्या अशी वर्च्युअल मैत्री आणि त्याची गंमत सोशल मिडीयावर पाहायला मिळतेय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive