अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा आज वाढदिवस आहे. सोशल मिडीयावर तिला शुभेच्छा देण्यासाठी मेसेज आणि पोस्टचा वर्षाव होत आहेत. त्यातच मृण्मयीची बहिण गौतमी देशपांडेने सोशल मिडीयावर खास पोस्ट करून बहिणीला शुभेच्छा दिल्या आहेत. गौतमी या पोस्टमध्ये लिहीते की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा, तू माझ्यासाठी सर्वकाही आहेस, आणि नेहमीच आहेस, खूप प्रेम.”गौतमी हे कॅप्शन लिहीत मृण्मयीचे तिच्यासोबत फोटोही पोस्ट केले आहेत.
गौतमी देशपांडे ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची लहान बहीण आहे. शिवाय ती देखील मृण्मयी प्रमाणेच अभिनेत्री म्हणून काम करते. एकीकडे मृण्मयीला नृत्याची आवड आहे तर गौतमीला गायनाची आवड आहे. विविध कार्यक्रमात गौतमीने गाणी गायली आहेत.