By  
on  

लहान मुलांच्या भावविश्वाभोवती फिरतोय ‘धप्पा’, पाहा ट्रेलर

दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांचा धप्पा हा आगामी आणि एक हटके पठडीतला सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'धप्पा' या सिनेमाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. लहानपणी धप्पा म्हणत अनेक खेळ खेळले जातात. पण तेव्हा आपल्या निरागस मनाला काहींचे अर्थच उलगडत नाहीत. त्याचे अर्थ समजेपर्यंत वय पुढे निघून गेलेलं असतं.  मग फक्त आठवणींमध्ये रममाण होण्याशिवाय काही पर्याय उरत नाही.

लहान मुलांच्या भावविश्वाभोवती 'धप्पा'ची कथा उलगडते. लहानपणी खेळता खेळता धप्पा, आपण म्हणायचे हे तुम्हालाही माहित असेलच. लहान मुलं म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर फक्त धम्माल येते. पण या सिनेमात फक्त धम्मालच नाही तर खुप मोठी शिकवणसुध्दा त्यांच्याकडून मोठ्यांना मिळणार आहे.

निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित, राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या ‘धप्पा’ या मराठी सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.

एका सोसायटीतील लहान मुलं गणेशोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी एक नाटक बसवण्याची तयारी सुरु करतात. पण त्यात नेमक्या कशा आणि कशा त-हेच्या अडचणींना सामोरं जावं लागतं. काय नाट्य घडतं, हे मात्र सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच आपल्याला समजेल.

विशबेरी फिल्मस् प्रस्तुत, इंक टेल्स आणि अरभाट फिल्म्स निर्मित ‘धप्पा’ या या सिनेमाला ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ (राष्ट्रीय एकात्मता) पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे. गिरीश पांडुरंग कुलकर्णी लिखित, निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित, ‘धप्पा’ चे यंदा इफ्फीतसुध्दा स्पेशल स्क्रीनींग पार पडले होते.

https://youtu.be/Runqqn9eYUs

राष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘धप्पा’ हा सिनेमा येत्या १ फेब्रुवारी २०१९ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive