स्पृहा जोशी ही मराठी सिनेसृष्टीतील गुणी अभिनेत्रींपैकी एक. तसंच अभिनयासोबतच लेखिका आणि एक उत्तम कवियत्री व निवेदिका म्हणूनही तिने आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. विविध मालिका, नाटक आणि सिनेमांमधून स्पृहाने प्रेक्षकांच्या मनात राज्य केलं आहे. सध्या सूर नवा ध्सास नवा – छोटे सूरवीरचं निवेदन करताना, तर स्पृहाने बच्चेकंपनीपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचीच मनं जिंकली आहेत.
नुकतंच 2018 या वर्षाला निरोप देत त्यावर्षी आलेल्या कटू-गोड आठवणींचा उल्लेख करत एक प्रेररणादायी पोस्ट स्पृहाने आपल्या सोशल अकाऊंटवरुन शेअर केली आहे. यावर्षात विविध पातळ्यांवर तिला स्ट्रगल करताना आलेले अनेक अनुभव तिने खुद्द चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. कधी शारिरीक टिप्पणी तर कधी ती प्रेग्नंट असल्याच्या अफवा पसरवल्याने अनेक निर्माता-दिग्दर्शकांनी तिला काम नाकारले होते. आपण सगळ्यांशी मनापासून प्रेमाने वागूनही आपल्याला पाण्यात पाहणारे इतके लोक आहेत याचं खूप दुःख स्पृहाला झालं. पण मग एका पॉईंटला तिचे डोळे खडखडून उघडले. तिने आता नवीन वर्षात या सर्व आव्हानांवर मात करत कठोर परिश्रमाच्या जोरावर सामोरं जायचं ठरवलं आहे.
https://www.instagram.com/p/BsFFUL9ninZ/