लॉकडाउनमध्ये सोशल मिडीयावर सध्या थ्रोबॅक पिक्चर्सचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. त्यातच मनोरंजन विश्वातील ऑफस्क्रिन कपल्सही त्यांचे थ्रोबॅक पिक्चर्स पोस्ट करत आहेत.
अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता ऋषि सक्सेना हे रियल लाईफ कपलही त्यांच्या थ्रोबॅक आठवणी मिस करत आहेत. म्हणूनच सध्या त्यांच्या थ्रोबॅक आठवणी सोशल मिडीयावर शेयर करत आहेत. ईशा केसकरने ऋषि सोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. दोघांच्या या रोमँटिक फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.
मागील 2 वर्षांहून अधीक काळ दोघं एकमेकांना डेट करत आहेत. दोघांच्या रिलेशनच्या सुरुवातीला ईशानेच ऋषिला प्रपोजं केल्याचही बोललं जातं.