By  
on  

'गली बॉय'मध्ये झळकणार अमृता सुभाष

मराठीतील गुणी अभिनेत्री म्हणून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अमृता सुभाष बॉलिवूडचा एनर्जी मॅन रणवीर सिंहच्या बहुचर्चित आणि आगामी 'गली बॉय' या सिनेमात झळकणार आहे. याबाबत खुद्द अमृतानेच आपल्या फेसबुकवरुन चाहत्यांना याची माहिती दिली.

गली बॉय सिनेमाचं पोस्टर सोशल मिडीयावर शेअर करत अमृताने लिहलं आहे. "या चित्रपटानी खूप मजा दिली काम करण्यातली..विजयराज, रणविरसिंग,झोया अख्तर धन्यवाद. गलीबाॅय..एका अनोख्या स्वप्नाची कथा..अपना टाईम आयेगा". या सिनेमात अमृताचे अनेक सीन्स हे रणवीर सिंहसोबत चित्रीत करण्यात आले आहेत. त्यामुळे अमृताने हा सिनेमा नक्की एन्जॉय केला असणार हे वेगळं सांगायची गरज नाही.

आलिया आणि रणवीर या दोघांनीसुध्दा नुकतंच आपल्या सोशल मिडीया अकाउंटवरुन सिनेमाचे पोस्टर शेअर करत प्रदर्शनाची तारीखसुध्दा उलगडली होती. येत्या व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर म्हणजेच 14 फेब्रुवारीला झोया अख्तर दिग्दर्शित  'गली बॉय' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

https://www.instagram.com/p/BsGE4saBqyD/

अमृता सुभाषने यापूर्वी नवाजिद्दीन सिध्दीकी स्टारर रमण राघव या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकरली होती. आता पुन्हा ती एका बॉलिवूड सिनेमाद्वारे प्रेक्षकांसमोर येतेय, त्यामुळे या सिनेमात अमृताला कोणत्या भूमिकेत पाहायला मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive