By  
on  

शिवराज्याभिषेक दिना निमित्त  कलाकारांचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाउनच्या परिस्थितीत आजचा शिवराज्याभिषेक दिन घरातच साजरा केला जात आहे. रायगडावरही निवडक शिवभक्तांसहा हा सोहळा संपन्न होत आहे. 
मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी मात्र सोशल मिडीयावर पोस्ट करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाजा मुजरा केला आहे. 
गानसम्राज्ञी लतादीदींनीही ‘आनंदवनभुवनी’ गाण्याचा व्हिडीओ पोस्ट करत या “दैवी पुरुषाला मी कोटी कोटी प्रणाम करते” असं त्या म्हटल्या आहेत.

 

दिग्दर्शक रवी जाधव यांनीही शिवरायांच्या चरणी प्रणाम करतानाचा फोटो पोस्ट करत “छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम” असं लिहीत शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शिवराज्याभिषेक दिन!!! छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा ! तुमच्या कडून शिकण्यासारखं बरंच काही आहे रयतेला सर्व परिस्थितीत एकत्र घेऊन पुढे जाणे, कठोर शिस्त, माणुसकी,राजेपण,राजकारण, पर्यावरण स्नेही, दुरदृष्टी .... तुम्हाला फक्त डोक्यावर घेण्याऐवजी जर आम्ही आचरणात आणू शकलो तर खऱ्या अर्थी आम्ही तुमचे मावळे!!!

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk) on

 

अभिनेता देवदत्त नागेने छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी खांद्यावर असलेला फोटो पोस्ट करत लिहीलं आहे की, “राजं, ही पवित्र पालखी ह्या खांद्यावर सदैव असावी, आज माझा खरा उत्सव हे, छत्रपती शिवाजी महाराज की जय.”

यासह बऱ्याच कलाकारांनी शिवरायांना मानाचा मुजरा केला आहे. सोशल मिडीयावर अशा पध्दतिने शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive