By  
on  

पहिल्यांदाच अशा एकत्र झळकल्या या मराठी अभिनेत्री, ‘घे उंच भरारी’ गाणं प्रदर्शित 

लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्व आणि चित्रीकरण जरी थांबलं असलं तरी कोरोनामुळे कलाकारांचं मनोबल खचलेलं नाही आणि उत्साहही कमी झालेला नाही. याचं ताजं उदाहरण म्हणजे मराठी अभिनेत्रींचं नुकतच प्रदर्शित झालेलं नवं गाणं.

 

‘घे उंच भरारी’ हे रेड बल्ब म्युजिकचं नवं गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात मराठी कला विश्वातील बऱ्याच अभिनेत्री पाहायला मिळत आहेत. या अभिनेत्रींनी घरातूच या गाण्यासाठी चित्रीकरण केलेलं आहे. या गाण्यात या अभिनेत्रींचा बिनधास्त, मनमौजी अंदाज पाहायला मिळतोय. कुणी गाण्याच्या ठेक्यावर नाचतय तर कुणी दिलखुलास हसतय. या अभिनेत्रींचं हे गाणं सध्याच्या परिस्थितीत सकारात्मक ऊर्जा देत आहे. 
या गाण्यात अभिनेत्री स्पृहा जोशी, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहेरे, संस्कृती बालगुडे, सायली संजीव, प्राजक्ता माळी, ऋतुजा बागवे, पल्लवी पाटील, भाग्यश्री लिमये, मयुरी देशमुख, स्वप्नाली पाटील या एकूण 11 अभिनेत्री झळकत आहेत. 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

उडायचं स्वप्नं प्रत्येकाचं असतं, पण स्वतः मुक्त होऊन... जे जगलं जातं, ते खरं आयुष्य! ज्यांनी ह्या लॉकडाऊनला आपली strength समजून नव्यानं एक झेप घेतली ते खरे मुक्त!. ह्या मुक्त होण्याला सेलिब्रेट करण्याची, त्या मुक्ततेत स्वतःच्या ध्यासासकट उंच भरारी घेण्याचं स्वप्नं जे बाळगतात त्या सगळ्यांसाठी हे गाणं! *"घे उंच भरारी"* रेडबल्ब म्युझिक प्रस्तुत हे गाणं घेऊन मी येतेय तुमच्या भेटीला! फक्त आपल्या रेडबल्ब म्युझिक चॅनेलवर. @sonalee18588 @prarthana.behere @spruhavarad @bhagyashreelimaye @sanskruti_balgude_official @sayali_sanjeev_official @rutuja_bagwe @prajakta_official @officialpallavipatil @mayurideshmukhofficialll @patilswapna @kevalwalanj @vipulshivalkar @Redbulbmusic @Redbulbgroup #Staytuned #redbulb studios #Redbulbmusic #newsong#newmusicvideo#video2020#lockdowntrending#musictrends#marathi#actress#unlock01#inspirationalsong

A post shared by RedBulb Music (@redbulbmusic) on

Author

Recommended

PeepingMoon Exclusive