By  
on  

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने केलं #37DaysChallenge , झाली इतकी फिट ?

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लॉकडाउनच्या आधीपासूच दुबईत आहे. फियान्से कुणाल बेनोडेकरसोबत सध्या सोनाली वेळ घालवत आहे. या दरम्यान सोनाली विविध गोष्टी करत आहे. फिटनेसकडे झालेलं दुर्लक्ष लक्षात येताच सोनालीने त्याकडे लक्ष देण्यास कधीच सुरुवात केली आहे. यासाठी सोनाली करत आहे #37DaysChallenge करत आहे. या चॅलेंजमध्ये 37 विविध फिटनेस वर्कआउट केल्या जातात. प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर प्रणीत शिलीमकरने या चॅलेंजला सुरुवात केली आहे. बऱ्याच कलाकारांना त्याने या चॅलेंजच्या अंतर्गत ट्रेन करून फिट केलं आहे.

सोनाली कुलकर्णीही सध्या हे चॅलेंज करत आहे. यासाठी सोनाली फिटनेस ट्रेनर प्रणीतकडून ऑनलाईन ट्रेनिंग घेत आहे. शिवाय फियान्से कुणालचीही तिला यासोबत साथ आहे. हे चॅलेंज करत असातानाचे वर्कआउट, डाएट या सगळ्या गोष्टींची ती व्यवस्थित काळजी घेत आहे. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओही ती अधून मधून पोस्ट करत आहे.

'हिरकणी' या सिनेमाच्या दरम्यान सोनालीचा जबरदस्त फिट अवतार पाहायला मिळाला होता. मात्र त्यानंतर सोनालीने पुन्हा इतर चित्रीकरण आणि प्रमोशनच्या कामात व्यस्त झाली होती. मात्र दुबईत आता सोनाली स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. या फिटनेस चॅलेंजंनंतर सोनालीचा फिट अवतार हळूहळू समोर येत आहे. यानंतर सोनाली लवकरच तिच्या फिट लुकने चाहत्यांना सरप्राईज करणार की काय असचं चित्र दिसतय.  

आगामी काळात लॉकडाउननंतर सोनाली तिच्या चाहत्यांसाठी कोणत्या वेगळ्या भूमिका घेऊन येत याविषयीची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive