By  
on  

सायबर गुन्ह्याविषयी सतर्क करताना महाराष्ट्र पोलिसांनी करून दिली 'खाँ' साहेबांची आठवण

सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनच्या काळात पोलिसांचेही मोलाचं योगदान आहे. फक्त सध्याच्या परिस्थितीतच नाही तर नेहमी जनतेच्या मदतीस तत्पर असणाऱ्या या पोलिसांविषयी नागरीकांच्या मनात कायम आदरयुक्त भावना असते. 

महाराष्ट्र पोलिसांच्या सोशल मिडीया अकाउंटवरून विविध संदेश देण्याची हटके पद्धत मात्र सध्या सगळ्यांनाच आवडत आहे. यातच पुन्हा एकदा एका सिनेमाची आठवण करुन देत महाराष्ट्र पोलिसांनी सायबर गुन्ह्यांविययी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. या पोस्टमध्ये महाराष्ट्र पोलिस म्हणतात की, "सायबर गुन्ह्याची ‘कट्यार’ तुमच्या अकाऊंटमध्ये घुसू देऊ नका! जेव्हा तुम्हाला कोणी - ‘वेगवेगळ्या अकाउंट चे पासवर्ड वेगळे आहेत ना?’ असं विचारतं, तेव्हा अभिमानाने ‘खाँ साहेबांसारखं’ उत्तर द्या."

 

'कट्यार काळजात घुसली' या मराठी सिनेमाची यावेळी त्यांनी आठवण करून दिली आहे. याच सिनेमाचा दिग्दर्शक अभिनेता सुबोध भावेने हे पाहताच त्यालाही ही कल्पना प्रचंड आवडली आहे. त्यानेही पोस्ट करून लिहीले की, "वाह वाह महाराष्ट्र पोलीस....तुमच्या कल्पना निरागस सुरा सारख्या आहेत....आपल्या सुरक्षित हातांमध्ये महाराष्ट्राचं "मनमंदिर तेजाने" उजळून निघूदे" 

विविध कल्पना घेऊन महत्त्वाचे आवाहन करणाऱ्या महाराष्ट पोलिसांच्या या  कल्पनेचेही कौतुक होत आहे. यंदा 'कट्यार काळजात घुसली' सिनेमातील 'खाँ' साहेबांची आठवण करून देत त्यांनी सायबर गुन्ह्याविषयी लोकांना सतर्क केलेलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive