महाराष्ट्राचे मानबिंदू हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट ‘ठाकरे’ हा देशासह जागतिक पातळीवर उलगडण्यासाठी सज्ज झालेला आहे. मुंबईकर आणि वडापाव यांच्यात एक अतूट नातं आहे. महाराष्ट्राची आन बान शान असलेल्या, दिवसाच्या कोणत्याही वेळेला सर्वसामान्यांचे पोट भरणा-या स्वस्तात-मस्त अशा महाराष्ट्रातील लोकप्रिय शिव वडापावची चव प्रेक्षकांना चाखता येणार आहे.
बाळासाहेब ठाकरेंसारख्या महाराष्ट्राच्या मातीतील रांगड्या व लोकप्रिय व्यक्तित्वाप्रमाणेच शिव वडापावने सामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ‘ठाकरे’ चित्रपटाच्या टिझर व ट्रेलर प्रक्षेपणादरम्यान स्टार्टर म्हणून वडापाव सर्व्ह करणाऱ्या निर्मात्यांच्या विचारसरणीस पाठिंबा देत 72 निवडक कार्निव्हल सिनेमा थिएटरमध्ये त्यांनी पॉर्पकॉन ऐवजी शिव वडापावची निवड त्यांच्या एफ अँड बी ऑफरमध्ये केलेली आहे. महाराष्ट्रीयन पाककृती सादर करण्यासाठी हे विशेष व्यासपीठ निवडण्यात आले आहे.
'ठाकरे' चित्रपटासह कार्निव्हल सिनेमामध्ये शिव वडापावचा आस्वाद घेत प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. तसंही देशाबाहेरील सिनेमागृहांतसुध्दा ठाकरे चित्रपटाबरोबर झणझणीत मराठमोळ्या शिव वडापावचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार असल्याचे समजते.
संजय राऊत प्रस्तुत, राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि कार्निव्हल मोशन पिक्चर्स निर्मित 'ठाकरे' या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तर अभिनेत्री अमृता राव माँसाहेब मीनाताई ठाकरेंच्या प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत.
अभिजित पानसे दिग्दर्शित 'ठाकरे' सिनेमा येत्या २५ जानेवारी २०१९ ला देशासह संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे.