By  
on  

लहानपणी पायाखाली परात आणि डोक्यावर कळश्या घेऊन थिरकली होती ही अभिनेत्री

पहिल्याच प्रयत्नात मिळालेलं यश हे कायम स्पेशल असतं. अभिनेत्री रिंकू राजगुरुसाठीही ते खास असेलच. सैराटची आर्ची म्हणून प्रसिध्द असलेली रिंकू आता स्टार म्हणून विविध सिनेमा आणि वेब सिरीजमध्ये झळकतेय. मात्र हे यश मिळत असताना जुन्या आठवणीही तिला तितकाच आनंद देत आहेत.

सध्या लॉकडाउनच्या काळात रिंकू देखील तिच्या  घरी आहे. मात्र या काळात ती तिच्या जुन्या आठवणींना देखील उजाळा देत आहे. रिंकूने तिच्या लहानपणीचे काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये शाळेतील सांस्कृतीक कार्यक्रमात रिंकू नृत्य सादर करताना दिसतेय. या पोस्टमध्ये रिंकू लिहीते की, "पायाखाली परात आणि डोक्यावर कळश्या घेऊन डान्स केला होता शाळेत."

शाळेतली ही खास आठवण रिंकूने शेयर केली आहे. आत्तापर्यंत केलेल्या सिनेमात आणि विविध पुरस्कार सोहळ्यात रिंकूने केलेला डान्सही प्रेक्षकांना आवडलाय. तेव्हा लहानपणापासून जोपासलेल्या या कला तिच्या करियरमध्येही तिला तितकाच आनंद देत असतील. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive