By  
on  

2020 या वर्षाविषयी सई ताम्हणकरची अशी गमतीशीर पोस्ट, म्हणते हे वर्ष या गाण्यासारखं..

2020 या वर्षाची कित्येकांनी उत्साहात आनंदात सुरुवात केली असेल. मात्र हे वर्ष सुरु होताच विविधं संकंट पाहायला मिळाली. यातलं मोठं संकट म्हणजे कोरोना व्हायरसचं. गेली तीन महिने देशात कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउन सुरु आहे. यातच सोशल मिडीयावर 2020 या वर्षाविषयीच्या विविध गमतीशीर पोस्ट आणि मीम्स पाहायला मिळत आहेत. मनोरंजन विश्वातील कलाकार विविध पोस्ट करून याविषयी सोशल मिडीयावर व्यक्त होत आहेत.

अभिनेत्री सई ताम्हणकरही ट्विटरवर व्यक्त होताना दिसत आहे. सईने नुकतीच एक ट्विटर पोस्ट केली आहे. सईला 2020 हे  वर्ष बॉलिवुडमधील एका प्रसिद्ध गाण्यासारखं वाटतय. 'आ देखे जरा किसमे कितना है दम' या प्रसिद्ध गाण्यासारखं हे वर्ष असल्याचं ट्विट तिने केलं आहे. 

 

 

या वर्षी घडत असलेल्या विविध घडामोडी पाहता कित्येक नेटकरी पुढील वर्षाची वाट पाहत असल्याच्या पोस्टही करत आहेत. त्यातच अभिनेत्री सई ताम्हणकरने केलेली ही पोस्ट देखील लक्षवेधी ठरतेय. यासोबत सगळ्यांनी घरी राहण्याचं आणि काळजी करण्याच आवाहनही सई या पोस्टमध्ये करत आहे.

सोशल मिडीयावर होत असलेल्या या सगळ्या पोस्टचा उद्देश्य एकच आहे की, या  सगळ्या संकटातून लवकर बाहेर निघण्यासाठी सगळेच आसुसले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive