By  
on  

आणि मृणाल कुलकर्णी खेळू लागल्या क्रिकेट, पोस्ट केला थ्रोबॅक फोटो

लॉकडाउनच्या काळात सध्या सोशल मिडीयावर थ्रोबॅक ट्रेंड सुरु आहे. यात मनोरंजन विश्वातील कलाकार मोठ्याप्रमाणात त्यांचे थ्रोबॅक फोटो पोस्ट करत आहेत. काही कलाकार त्यांचे लहानपणीचे फोटो तर काही कलाकार त्यांच्या करियरमधील जुने फोटो पोस्ट करत आहेत.

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या देखील हा ट्रेंड फॉलो करत आहेत असच म्हणावं लागेल. लॉकडाउनच्या काळात त्यांनी त्यांच्या करियरमधील विविध भूमिकांमधील जुने फोटो पोस्ट केले होते. विशेषकरून त्यांनी केलेल्या 'रिश्ते', 'मिराबाई', 'द्रोपदी' यासारख्या मालिकेतील भूमिकांचे फोटो त्यांनी या दरम्यान पोस्ट केले. मात्र नुकताच पोस्ट केलेल्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. मृणाल कुलकर्णी यांनी नुकताच त्या क्रिकेट खेळत असतानाचा जुना फोटो पोस्ट केला. "व्हाय नॉट ?" असं लिहीत त्यांनी हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्यांनी क्रिकेट खेळतानाचा संपूर्ण पेहरावही केलेला दिसतोय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Why not !!! ??

A post shared by Mrinal Kulkarni (@mrinalmrinal2) on

 

आजवर विविध भूमिका साकारलेल्या मृणाल कुलकर्णी यांचे हे विविध अवतार पाहायला त्यांच्या चाहत्यांना आवडतय. आगामी काळात त्यांचे आणखी काही थ्रोबॅक फोटो पाहण्यासाठी चाहते मात्र उत्सुक असतील एवढं नक्की.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive