“असं काय होतं ज्याने तू इतका कमकुवत झालास ?”  सुशांतच्या आत्यहत्येच्या बातमीने ‘पवित्र रिश्ता’मधील अभिनेत्री दु:खी

By  
on  

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या बातमीने बॉलिवुडसह त्याच्या टेलिव्हिजन विश्वातील सह कलाकारांनाही मोठा धक्का बसला आहे. 
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून सुशांत प्रचंड प्रसिध्द झाला होता. या मालिकेत त्याच्यासोबत सहकलाकार म्हणून काम केलेली अभिनेत्री प्रिया मराठे त्याच्या निधनाने प्रचंड दु:खी आहे.

 

प्रियाने सोशल मिडीयावर सुशांतसोबतच्या काही सीनचे फोटो पोस्ट करत एक मेसेज लिहीला आहे. यात ती लिहीते की, “एक अतिशय बुध्दीवान, कामात लक्ष केंद्रित असणारा, मेहनती, हुशार अभिनेता, ज्याच्यात त्याची बॉलिवुडमध्ये करियर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत होती. जेव्हा तू इंजीनियरींग सोडून या क्षेत्रात आलास, जेव्हा पवित्र रिश्ता ही त्यावेळी टॉपला असताना ती मालिका सोडून बॉलिवुडमध्ये मोठं होण्यासाठी पाऊल उचललं तेव्हाच तू तुझी ताकद दाखवून दिली होती.मग असं काय होतं ज्याने तू इतका कमकुवत झालास ?  तू नेहमीच आठवणीत राहशील..”

 
 

Recommended

Loading...
Share