गोव्याचे माजी मंत्री आणि अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचे वडिल अच्युत काशीनाथ उसगांवकर यांचे मंगळवारी सकाळी रुग्णालयात निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. वृध्दापकाळाने त्यांचं निधन झालं असल्याचं बोललं जात आहे.
अच्युत उसगांवकर हे गोव्याचे सगळ्यात जुने राजनीतिक दल महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीचे नेते होते.1977 ते 1979 या दरम्यान ते गोवा, दमण आणि दीव मंत्रिमंडळाचे सदस्य होते.
उसगावकर हे मिरामार येथे राहत होते. काही काळापासून ते वृध्दापकाळाने आजारी होते. 70 च्या दशकात ते मंत्री आणि आमदार म्हणून प्रसिद्ध होते.बांबोळीच्या गोमॅका रुग्णालयात सकाळी साडे सात वाजता त्यांचे निधन झाले. आज संध्याकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यंसंस्कार होईल.