अभिनेता गश्मीर महाजनी हा मराठी गाण्यांवर देणार नृत्याचे धडे

By  
on  

 सध्याच्या लॉकडाउनच्या काळात  अभिनेता गश्मीर महाजनीने त्याच्या सोशल मिडीयावरील पोस्ट्सच्या माध्यमातून विविध गोष्टी केल्या आहेत. विविधं व्हिडीओच्या माध्यमातून सकारात्मकता पसरवण्यासोबतच तो काही महत्त्वाचे व्हिडीओही पोस्ट करताना दिसला. काही फिटनेस आणि डान्स व्हिडीओ त्याने या दरम्यान शेयर केले.

अभिनयासोबतच गश्मीरला नृत्याचीदेखील आवड आहे. एवढच नाही तर त्याचं डान्स अकॅडमीसुद्धा आहे. मात्र या लॉकडाउन दरम्यान घरात बसलेल्या आणि नृत्याची आवड असलेल्यांसाठी गश्मीर काही डान्स वर्कशॉप घेऊन आला. त्याच्या या वर्कशॉपला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आणि म्हणूनच गश्मीर आणखी एक वर्कशॉप घेऊन येत आहे. या वर्कशॉपमध्ये गश्मीर हा मराठी सिनेमातील प्रसिद्ध गाण्यांवर नृत्याचे धडे देईल. 

 

गश्मीरला फिटनेस आणि नृत्याची प्रचंड आवड आहे. त्याच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही तो याविषयीच्या गोष्टी पोस्ट करताना दिसतो. लवकरच 'सरसेनापती हंबीरराव' या प्रवीण तरडे यांच्या आगामी ऐतिहासीक मराठी सिनेमात गश्मीर झळकणार आहे.

Recommended

Loading...
Share