इतर विविध दिवसांप्रमाणेच योगदिनही साजरा करायचं अभिनेत्री प्राजक्ता माळीने ठरवलय. सेलिब्रिटी फिटनेस इस्ट्रक्टर रीमा वेंगुर्लेकडून प्राजक्ता योगाचे धडे घेते. लॉकडाउनमध्येही वर्च्युअल क्लासच्या माध्मातून योगा करतेय. मात्र 21 जून रोजी साजरा करण्यात येणाऱ्या योगदिनी तब्बल 108 सुर्यनमस्कार घालण्याचं प्राजक्ताने ठरवलं आहे.
कोरोना व्हायसरच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सहावा योग दिवस हा व्हर्च्युअली साजरा होणार असल्याने ‘घरीच आणि घरच्यांसोबत योगा ’ ह्या थीमनूसार योगा दिवस साजरा होणार आहे. त्यामुळेच रीमाने सर्वांना व्हर्च्युअली एकत्र आणून योगा करण्याचा निर्णय घेतला आहे.
अष्टांग योगा शिकवणा-या रीमा वेंगुर्लेकरकडे अनेक मराठी सेलिब्रिटीही योगा शकायला येतात. अमृता खानविलकर, सुव्रत जोशी, प्राजक्ता माळी, सिध्दार्थ मेनन, सायली संजीव, संजय जाधव, ऋता दुर्गुळे असे मराठी सिनेसृष्टीतील अनेक तारे-तारका तिचे शिष्य आहेत. मात्र यापैकी प्राजक्ता ही रीमासोबत लाईव्ह सुर्यनमस्कार घालणार आहे तेही तब्बल 108 सुर्यनमस्कार.
याविषयी प्राजक्ता म्हणते की, “इतर कोणत्या डेजला आपण एकमेकांना शुभेच्छा पाठवतो पण योगा डेला तरी काहीतरी फिजीकल एक्टिव्हिटी व्हायला पाहिजे. म्हणूनच माझी योगा टीचर रीमा आणि मी मिळून असं ठरवलं की, योगा दिनाच्या दिवशी 108 सुर्यनमस्कार घालायचे.”
रीमा वेंगुर्लेकरचे हे व्हर्च्युअल सेशन्स सर्वांसाठी विनामुल्य उपलब्ध असणार आहे.