By  
on  

'खंडेराया झाली माझी दैना' नंतर आता 'सुरमई'चा तडका

कॉलेज फेस्ट असोत वा लग्नाची वरात... सध्या फक्त एकाच गाण्याची चलती आहे आणि ते गाणं म्हणजेच 'खंडेराया झाली माझी दैना... दैना रे... तिच्याविना जीव माझा राहीना...' गुलाबी थंडीत उमलणाऱ्या प्रेमाची साक्ष देणाऱ्या या गाण्याने अनेक जोड्या जुळवल्या असून मराठी सिंगल अल्बम्सचे सगळे ठोकताळे मोडीत काढलेत. ट्रेडिशनल गाण्याला दिलेल्या रोमँटिक टचमुळे 'खंडेराया झाली माझी दैना' या गाण्याने महिन्याभरातच तब्ब्ल १९ मिलियन व्ह्यूज तर लाखोंनी लाईक्स मिळवलेत. स्पेशली युथमध्ये गाजलेल्या या गाण्यानंतर पुन्हा एकदा एव्हरेस्ट मराठी एन्टरटेनमेन्ट आणि चेतन गरुड यांच्या संयुक्तविद्यमाने नव्या दमाचं धमाल रोमँटिक कोळी गीत रसिकांच्या भेटीस येणार आहे. अमित बाईंग दिगदर्शित आणि
प्रवीण शिंदे, पूजा कासकर यांच्या सिझलिंग केमिस्ट्रीत रंगलेलं 'सुरमई' हे कोळी गीत रसिक-प्रेक्षकांना नक्कीच ताल धरायला लावणार आहे.

पिंपळगाव हरेश्वर या छोट्याशा गावातील चेतन रवींद्र गरुड या तरुणाने 2018 मध्ये मराठी सिंगल अल्बममध्ये 'खंडेराया झाली माझी दैना' हे सर्वात लोकप्रिय गाणं मराठी प्रेक्षकांना दिलं जे सर्वत्र जोरदार वाजलं आणि गाजलं देखील. आत्ता प्रेक्षकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या असून त्यांनी आपलं दुसरं गाणं २०१९ च्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या
स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला. चेतन गरुड प्रोडक्शन्स आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंट यांचं दुसरं गाणं सुरमई ११ जानेवारीला रिलीज होणार आहे.

कोळीगीतांची आजही क्रेझ काही कमी झालेली नाही म्हणूनच ते 'सुरमई' हे रोमँटिक कोळीगीत आपल्यासाठी घेऊन आले आहेत. या गाण्याचे बोल प्रवीण बांदकर यांचे असून त्याला संगीत सुद्धा त्यांचेच आहे शिवाय या तडकत्या-भडकत्या कोळी गीताला आदर्श शिंदे यांच्या आवाजाने चारचाँद लावलेत हे विशेष. 'सुरमई'ला अमित बाईंग यांचं नृत्य-दिगदर्शन लाभलेअसून लॉरेन्स यांच्या छायांकनानं अल्बममधील प्रत्येक फ्रेम अन् फ्रेम आपल्याला प्रेमात पाडायला भाग पाडते तर या गाण्याचे संकलन अभिषेक ओझा यांनी केले आहे.

https://youtu.be/1lvSzB-YWH8

'खंडेराया' नंतर आता 'सुरमई'ला ही प्रेक्षक पसंती लाभेल यात काही शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive