By  
on  

 अशोक सराफ  यांचा हा सिनेमा आता अमेझॉन प्राईमवर 

अभिनेता अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे हे दोन अनुभवी कलाकार प्रवास या सिनेमाच्या निमित्ताने स्क्रिनवर एकत्र झळकले. दोघं पहिल्यांदाच एकत्र झळकले असले तरी त्यांच्या केमिस्ट्रीने सिनेमाची कहाणी फुलली. शशांक उदापुरकर यांच्या याच वर्षी आलेल्या सिनेमाला पसंती मिळाली. क्रिटीक्सनेही सिनेमाचं कौतुक केलं. 
एका जोडप्याची कहाणी जी विशिष्ट वळणावर करत असलेला प्रवास आणि त्यात घडत जाणाऱ्या विविध घटनांचा या कथेत समावेश आहे. आणि हाच सिनेमा आता ओटीटीवर अनुभवता येणार आहे. कारण प्रवास हा मराठी सिनेमा आता अमेझॉन प्राईमवरही दाखवण्यात येत आहे. 

अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी या सिनेमातील अशोक सराफ यांच्या पात्राच्या पत्निची भूमिका साकारली आहे. शिवाय या सिनेमात विक्रम गोखले, रजीत कपूर आणि स्वत: शशांक उदापुरकरदेखील आहेत. अशोक सराफ यांच्या अभिनयाची कमाल याही सिनेमात पाहायला मिळते.


तेव्हा ज्यांनी ही सुंदर सिनेमारुपी कहाणी मिस केली असेल तर त्यांना हा सिनेमा आता ओटीटीवर पाहता येणार आहे. सध्या लॉकडाउनच्या काळात प्रेक्षकवर्ग ओटीटी कडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. त्यातच हा सिनेमा देखील ओटीटीवर दाखल झाला आहे.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive