लॉकडाउनमुळे अनेक सिनेमांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. तर काही सिनेमांचं बरचं काम बाकी असल्याने त्यांनी प्रदर्शनाची घोषणा केली नाही. तर काही सिनेमे सिनेमागृहे बंद असल्याने ओटीटीवर प्रदर्शित झाले.
या लॉकडाउनचा फटका ‘वेल डन बेबी’ या आगामी मराठी सिनेमालाही बसला. 12 जून रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. मात्र सिनेमाचं काम रखडल्याने या सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर गेलं. या सिनेमात अभिनेत्री अमृता खानविलकर, पुष्कर जोग आणि अभिनेत्री वंदना गुप्ते हे कलाकार आहेत.
‘वेल डन बेबी’ या सिनेमाची दिग्दर्शिका प्रियांका तनवर यांनी नुकताच सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट केला आहे. य़ा फोटोत अमृता ही डबिंग करताना दिसतेय. तर या सिनेमासाठीचं डबिंग अमृताने केलं आहे. या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सध्या सुरु आहे. या सिनेमाच्या निमित्ताने या सिनेमातील तिनही कलाकार पहिल्यांदाच एकमेकांसोबत झळकणार आहेत.
तेव्हा हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला कधी येतोय याचीच वाट पाहायची आहे.