राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या 2018-19 या वर्षातील कला क्षेत्रातील दोन जीवनगौरव पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.
यामध्ये तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार हा ज्येष्ठ तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांना जाहीर झाला आहे. रुपये पाच लाख, मानपत्र आणि मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या कलाकाराला हा पुरस्कार देण्यात येतो.
तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारांना दिला जाणारा राज्य शासनाचा वर्ष २०१८-१९ या वर्षाचा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांना जाहीर- सांस्कृतिक कार्यमंत्री @AmitV_Deshmukh यांनी केली घोषणा pic.twitter.com/XQFf7tmBJL
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 24, 2020
तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार हा ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतीक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी ही घोषणा केली आहे.
राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांची निवड- सांस्कृतिक कार्यमंत्री @AmitV_Deshmukh pic.twitter.com/a74Bigw2iD
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 24, 2020